औषध कंपन्यांनी चांगल्या प्रतीचे औषध उत्पादन करताना जीएमपी प्रक्रियेचा अवलंब करावा सरकारचे निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : औषधकंपन्यांनी चांगल्या प्रतीचे औषध उत्पादन करताना जीएमपी म्हणजे प्रमाणित उत्पादन प्रक्रियेचा अवलंब करावा असे निर्देश सरकारने दिले आहेत.  कच्च्या मालाची उच्च प्रत, उत्पादनात निर्दोष प्रक्रियांचा आणि योग्य यंत्रांचा वापर या सर्वांचा समावेश असणाऱ्या जीएमपी या मानकाचे पालन  औषध कंपन्यांना अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशात निर्माण होणाऱ्या औषधांंची गुणवत्ता राखण्याच्या हेतूने सरकारने हा निर्णय घेतल्याचे आरोग्य आणि कुटुंबकल्य़ाण मंत्रालयानं म्हटलं आहे. 

जीएमपी मानकाच्या पालनासाठी 250 कोटींहून अधिक उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना 6 महिन्यांची तर त्याहून कमी उलाढाल असणाऱ्या कंपन्यांना 12 महिन्यांची मुदत दिल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image