दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्ण जीवन देणं ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे - राष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानपूर्ण जीवन देणं  ही संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  केलं. नवी दिल्लीत नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड या  संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  दृष्टीहीन व्यक्तींना सहानुभूतीऐवजी शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी मिळणं आवश्यक आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड ही संस्था गेल्या पन्नास वर्षांपासून दृष्टीहीनांच्या प्रगतीसाठी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांनी संस्थेची प्रशंसा केली.