विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लवकरच विविध परीक्षा मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा वर्षातून २ वेळा होणार आहे. यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या परीक्षेचे गुण विद्यार्थ्यांना भविष्यात वापरता येतील. वर्षातून एकदाच परीक्षा होऊन विद्यार्थ्यांवर येणारा ताण यामुळं कमी होणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल नवी दिल्ली इथं शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा प्रकाशित केला. त्यात हे नमूद केलं आहे.

यावेळी बोलताना प्रधान म्हणाले की, शालेय शिक्षणासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जारी करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून नवीन पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image