पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पथकर नाक्यावर सरासरी प्रतीक्षा वेळ 734 सेकंदांवरून 47 सेकंदांपर्यंत कमी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं केलेल्या फास्टटॅग वरील प्रभाव मूल्यांकन अभ्यासातून हे स्पष्ट झाल्याचं यामध्ये म्हटलं असून राष्ट्रीय महामार्गावरील पथकर नाक्यांवर वाहनं ठराविक वेळेपेक्षा जास्त थांबल्यास वापरकर्त्यांच्या शुल्कातून वाहनांना सवलत देण्याची कोणतीही तरतूद नसल्याचं यामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.