आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण  देशभर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. यासाठी देशातल्या टपाल विभागाच्या एक लाख 60 हजार कार्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची विक्री करण्यात येत आहे. ई-पोस्ट ऑफिस सुविधेच्या माध्यमातूनही नागरिकांना राष्ट्रध्वज खरेदी करता येणार आहे. लोकांच्या मनात देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आल्याचं दळणवळण मंत्रालयानं म्हटलं आहे. 2022 मध्ये या मोहिमेला प्रचंड यश मिळालं होतं ज्यामध्ये 23 कोटी कुटुंबांनी त्यांच्या घरी राष्ट्रध्वज फडकवला आणि सहा कोटी लोकांनी हर घर तिरंगा वेबसाइटवर सेल्फी अपलोड केले होते.

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image