ESIC अंतर्गत 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्मचारी विमा योजना अर्थात ESICअंतर्गत यावर्षी मे महिन्यात 20 लाखांहून अधिक नवीन सदस्यांनी नोंदणी केली आहे. ESIC च्या तात्पुरत्या वेतनपट आकडेवारीनुसार मे महिन्यात जवळपास 24 हजार 886 नवीन आस्थापनांनी नोंदणी करून आपल्या कर्मचाऱ्यांना या सामाजिक सुरक्षा छत्राखाली आणलं आहे.

मे महिन्यात जोडल्या गेलेल्या 20 लाख 23 हजार नव्या सदस्यांमध्ये तरुणांचं प्रमाण अधिक असल्यानं या काळात रोजगार निर्मितीत वाढ झाली असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नवीन सदस्यांपैकी 9 लाख 40 हजार जण 25 वर्षांच्या आतील वयोगटातले आहेत.