जागतिक उद्दिष्टांची पूर्तता करण्यास संयुक्त अरब अमिरात आणि भारत वचनबध्द -प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक उद्दिष्टांची पुर्तता करण्यास संयुक्त अरब अमिरात आणि भारत वचनबध्द आहे असं प्रधानमंत्र्य़ांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमीराती तसंच फ्रान्सच्या दौऱ्यावरुन परतले. या दौऱ्याबद्दल त्यांनी  ट्विट केलं आहे.  संयुक्त अरब अमिरात आणि भारत हे जागतिक भल्यासाठी एकत्रितपणे काम करतील असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटल आहे. या भेटीची ध्वनीचित्रफितसुद्धा त्यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केली आहे.

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष शेख मोहम्मद झायेद अल न्यायह्यान यांनी भारताचे यशस्वी चांद्रयान मोहिमेबद्दल अभिनंदन केल्याबद्द्ल मोदींनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.  चांद्रयान मोहिमेचे यश हे मानवजातीच्या भल्यासाठी आहे असं मोदींनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्र्य़ांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉं यांचेही आभार मानले आहेत. भारत आणि फ्रान्समधले बंध काळानुरुप दृढ होत जातील असंही त्यांनी म्हटलं आहे. फ्रान्सचा दौरा चिरस्मरणीय आहे असंही त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.