जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जिवाश्म आणि इतर स्त्रोतांकडून मिळणाऱ्या वीजेचं लक्ष्य देशानं ९ वर्ष आधीच मिळवलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते आज गोव्यात सुरु असलेल्या जी २० देशांच्या मंत्रीस्तरीय बैठकीला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. भविष्यकालीन, टिकाऊपणा, आर्थिक वृद्धीसह विकास अशा कोणत्याही विषयावरची चर्चा ही ऊर्जेच्या चर्चेशिवाय अपूरी असल्याचंही त्यांनी सांगितलं. २०३० पर्यंत देशात अपांरपारिक उर्जेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत आणण्याची योजना तयार करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

ऊर्जेच्या रुंपातरणाबाबत प्रत्येक देशाची परिस्थीती आणि पद्धती वेगळ्या असल्या तरी सगळ्यांचं लक्ष्य एकच आहे असंही ते म्हणाले. भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला आणि वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेचा देश असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी सर्व सहभागी देशांना एक सुर्य, एक जग आणि एक ग्रिड योजने बरोबरचं हरित ग्रीड मध्ये सहभागी होण्याचं आवाहनही केलं.