उत्तराखंडच्या गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रात भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तराखंडच्या काही भागात आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. गढवाल आणि कुमाऊं क्षेत्रात मुसळधार पावसात  भूस्खलन झाल्यामुळे अनेक रस्ते अजूनही वाहतुकीसाठी बंद आहेत. ते पूर्ववत करण्याचा प्रयत्न  युद्धपातळीवर सुरु आहे. राज्यातल्या  सर्व प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे, तरी त्या धोक्याच्या पातळी खाली वाहत आहेत.

राज्यात सध्या सुरू असलेली कंवर आणि चारधाम यात्रा सुरळीतपणे  सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागानं राज्याच्या बहुतांश भागात अतिवृष्टीचा येलो अलर्ट जारी केला आहे, तर चंपावत, पौरी, उधम सिंह नगर आणि नैनिताल जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.