राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचा चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आजपासून चित्रपटविषयक नवीन उपक्रम सुरू करत आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सहकार्याने संग्रहित आणि पुनर्संचयित चित्रपटांचं प्रदर्शन आजपासून दर शनिवारी मुंबईतल्या पेडर रोड इथल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात संध्याकाळी 4 वाजता होणार आहे.

आज गुरुदत्त यांच्या 'प्यासा' या अभिजात चित्रपटाने या उपक्रमाचा प्रारंभ होईल. भारतीय चित्रपटसृष्टीच्या वारशाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने एनएफडीसी-एनएमआयसी आणि एनएफडीसी-एनएफएआय यांनी एकत्रितपणे हा उपक्रम आखला आहे. एनएमआयसीच्या सभागृहात दर शनिवारी संध्याकाळी 4 वाजता हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर चित्रपटाचे प्रदर्शन विनामूल्य असणार आहे.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image