बीसीसीआयकडून निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची नियुक्ती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने निवड समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू अजित आगरकर यांची  नियुक्ती केली आहे. शिवसुंदर दास,सुब्रतो बॅनर्जी, सलिल अंकोला आणि श्रीधरन शरत हे निवड समितीचे इतर सदस्य आहेत.

मागच्या पिढीत अष्टपैलू खेळाडू म्हणून अजित आगरकर यांनी २६ कसोट्या, १९१ एकदिवसीय सामने, चार टी ट्वेंटी, या व्यतिरिक्त प्रथम दर्जाचे११०सामने, २७० अ श्रेणी सामने खेळले आहेत.  २००० मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध २१ चेंडूत अर्धशतक करून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा भारतीय फलंदाज हा विक्रम त्यांच्या नावावर आहे.