२ महिन्यांच्या हिंसाचारानंतर मणिपूरमधल्या शाळा पुन्हा सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मणिपूरमध्ये इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग काल पुन्हा सुरू झाले. राज्यात ३ मे पासून जातीय संघर्ष सुरू झाल्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. मणिपूरमध्ये चार हजार ६०० हून अधिक शाळा असून त्यातल्या सुमारे शंभर शाळांमध्ये मदत केंद्र सुरु असल्यामुळे तिथे प्रत्यक्ष वर्ग घेता आलेले नाहीत. मणिपूर राज्य शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना स्थलांतरित करून किंवा मदत शिबिरं स्थलांतरित करून  या शाळा सुरू करण्यासाठी स्वतंत्र आदेश जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

इयत्ता अकरावी बारावीचे वर्गही लवकरात लवकर पुन्हा सुरू केले जातील असं मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी या आधीच जाहीर केलं  आहे .दरम्यान अशा घटना रोखण्यासाठी आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लष्कर आणि आसाम रायफल्सला  राज्याच्या  संवेदनशील भागात तैनात करण्यात आला असून विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचं काम सुरु आहे.