भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमधील गुंतवणूकीत वाढ - परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताची टांझानियात व्यापक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक वाढत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते आज दार एस सलाम इथं भारत टांझानिया व्यापार परिषदेत बोलत होते. भारत हा टांझानियाचा सर्वोत्तम व्यापारी भागीदार असून भारत ही भागीदारी आणखी पुढे नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. 

जयशंकर दार एस सलाम इथं राजदूत स्तरीय परिषदेलाही उपस्थित होते. या परिषदेत त्यांनी विविध देशांबरोबर असलेल्या भारताच्या संबंधांचा आढावा घेतला. दार एस सलाम इथं स्वामी विवेकानंद संस्कृती केंद्रात स्वामी विवेकानंद यांच्या अर्ध पुतळ्याचं अनावरण जय शंकर यांनी केलं.