व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांनी लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून स्वीकारला पदभार

 

नवी दिल्‍ली: लष्करी व्यवहार विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांनी 03 जुलै 2023 रोजी  पदभार स्वीकारला. यापूर्वी या पदावर लेफ्टनंट जनरल अनिल पुरी  होते, ते 28 फेब्रुवारी 2023 रोजी सेवानिवृत्त झाले.

व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांची 01 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती झाली होती . ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (71 वा अभ्यासक्रम, डेल्टा तुकडी); डिफेन्स सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज, मीरपूर (बांगलादेश) आणि नवी दिल्लीतील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे. त्यांनी आशिया प्रशांत  सुरक्षा अभ्यास केंद्र, हवाई, अमेरिका  येथे अत्याधुनिक संरक्षण  सहकार्य अभ्यासक्रम देखील पूर्ण केला आहे.

अति विशिष्ट सेवा पदक (एव्हीएसएम) आणि विशिष्ट सेवा पदक (व्हीएसएम) प्राप्त, व्हाइस अँडमिरल अतुल आनंद यांना त्यांच्या कारकिर्दीत, टॉरपीडो रिकव्हरी वेसल INTRV A72 सह; क्षेपणास्त्र जहाज आयएनएस चातक; सशस्त्र नौदल जहाज आयएनएस खुकरी आणि विनाशिका आयएनएस  मुंबईच्या कमांडसह अनेक महत्त्वाच्या पदावर कार्य केले आहे. त्यांनी शारदा, रणविजय आणि ज्योती या भारतीय नौदलाच्या  जहाजांचे दिशादर्शन अधिकारी  म्हणूनही काम केले आहे आणि सी हॅरियर स्क्वाड्रन आयएनएएस 300चे दिशादर्शक अधिकारी आणि विनाशिका आयएनएस  दिल्लीचे ते कार्यकारी अधिकारी होते. सहसंचालक, कर्मचारी आवश्यकता; संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालय, वेलिंग्टन येथे कर्मचार्‍यांना संचालित करणे; संचालक, नौदल मोहिमांचे संचालक आणि नौदल गुप्तवार्ता (ऑप्स) विभागाचे संचालक या महत्वाच्या पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडल्या आहेत. 

त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या (नौदल) एकात्मिक मुख्यालयात, नौदल मोहिमांचे प्रधान संचालक आणि रणनीती, संकल्पना आणि परिवर्तन विभागाचे प्रधान संचालक म्हणूनही काम केले आहे. ध्वज अधिकारी म्हणून, त्यांनी नौदल कर्मचारी (परराष्ट्र, सहकार्य आणि गुप्तवार्ता) सहाय्यक प्रमुख; राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला येथे उप  कमांडंट आणि मुख्य प्रशिक्षक; महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे ध्वज अधिकारी  कमांडिंग; ध्वज अधिकारी  कमांडिंग कर्नाटक नौदल कार्यक्षेत्र  आणि नौदल मोहिमांचे महासंचालक म्हणूनही काम केले आहे.