डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे मोफत विशेष सर्व रोग निदान शिबीर

 

पिंपरी : डॉ . डी. वाय पाटील  विद्यापीठ, पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी पुणे येथे दि. ६  जुलै (गुरुवार) २०२३ ते १५ जुलै (शनिवार) २०२३ पर्यंत  मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

या शिबिरामध्ये संधिवात, आमवात, पक्षाघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे,- पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा -सल्ला मार्गदर्शन, बालपक्षाघात, पोटदुखी, जन्तांचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे- भूक न लागणे, शय्यामूत्रता (अंथरुणात लघवी करणे) इ. तसेच  स्रियांचे सर्व  विकार, वंध्यत्व चिकित्सा, प्रसुतीपूर्व तपासणी, त्वचा विकार, सौंदर्योपचार, हृदयरोग, पोटाचे विकार पित्ताशयातील खडे, मुतखडा, शरीरावरील लहान-मोठ्या गाठी, मूळव्याध, भगंदर, फिशर, हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसिल, थॉयरॉईडच्या गाठीची शस्त्रक्रिया व मोतीबिंदू ऑपरेशन अल्प दरात उपलब्ध आहेत, त्याच प्रमाणे डोळे, कान, नाक, घसा यावरील उपचार व सल्ला मार्गदर्शन व आहारविषयक व योगविषयक मार्गदर्शन केले जाईल. आशा विविध व्याधींचे योग्य रोग निदान करण्यात येईल. निदान झालेल्या आजारावर आजारांवर तीन दिवसांची औषधे मोफत देण्यात येतील. चिकित्सा झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात मोफत रहाण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध आहे .

डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद रुग्णालया-मार्फत विषेश योजना सुरु करण्यात आली आहे. यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मूळव्याध, भगंदर, फिशर शस्त्रक्रिया आणि नॉर्मल व सिझेरियन प्रसूती  उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.

शिबिराची वेळ स.९ ते दु. ४ वा. पर्यंत असेल. रविवारी सुट्टी राहील. कृपया रुग्णांनी याची नोंद घ्यावी. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुर्वेद रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ७७९६६६३३६६  या क्रमांकावर संपर्क साधावा.