मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्य आणि बियरचा साठा जप्त

 

मुंबई : पालघर जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क विभागाने मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रात बंदी असलेला मद्य आणि बियरचा साठा जप्त केला तसंच साठा घेऊन येणारं वाहनही ताब्यात घेतलं आहे.

वसईजवळच्या सकवार इथं ही कारवाई केली. हा साठा दादरा नगर हवेलीहून महाराष्ट्रात आणला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली असून महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.