राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांनी केले उद्‌घाटन आणि पायाभरणी

 

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग  प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि पायाभरणी केली.

राजस्थानमध्ये एकूण 219 किमी लांबीच्या आणि 3,775 कोटी रुपये खर्चाच्या चार राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे आज उद्‌घाटन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग 48 वरील किशनगड ते गुलबापुरा विभागापर्यंतचा हा सहा पदरी प्रकल्प अजमेर आणि भिलवाडा जिल्ह्यांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाला गती देईल. गुलाबपुरा ते चित्तौडगड मार्गाच्या  सहा पदरीकरणामुळे उदयपूर, जयपूर आणि भिलवाडा तसेच चित्तौडगड जिल्ह्यांतील कोटा क्षेत्रांची अंतर्गत संपर्क व्यवस्था मजबूत होईल.  फतेहनगर येथे राष्ट्रीय महामार्ग 162A वर चार पदरी उड्डाणपूल बांधल्याने रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल.

एकूण 221 किमी लांबीच्या आणि 1850 कोटी रुपये खर्चाच्या 7 प्रकल्पांची आज पायाभरणी करण्यात आली. या प्रकल्पांमुळे प्रसिद्ध धार्मिक स्थळ नाथद्वारा ते उदयपूर विमानतळापर्यंत थेट संपर्क व्यवस्था उपलब्ध होईल.

राजस्थानमध्ये केन्द्रीय रस्ते निधी अंतर्गत 2250 कोटींच्या 74 प्रकल्पांना मंजुरी देण्याची घोषणाही या कार्यक्रमादरम्यान करण्यात आली. या प्रकल्पांचे काम लवकरच सुरू होणार आहे.