चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चांद्रयान 3 ची कक्षा वाढवण्यात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला काल यश आलं. पहिल्या टप्प्यात चांद्रयान 173 किलोमीटरच्या पृथ्वीच्या कक्षेमध्ये 41 हजार 782 अंतरावर ठेवण्यात आलं आहे. पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे 173 किलोमीटर तर सर्वात लांब म्हणजे 41 हजार 782 किलोमीटरच्या कक्षेमध्ये सध्या चांद्रयान फिरत आहे. या यानाची स्थिती सध्या सामान्य असल्याचं इस्रोच्या सूत्रांनी सांगितलं आहे. चंद्राच्या 42 दिवसांच्या या स्वारीदरम्यान, चांद्रयानाची कक्षा 18, 20 आणि 25 जुलै रोजी वाढवण्याचं नियोजित आहे.