राज्य शासनाची नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य शासनानं नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली असून या योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यामधले २ लाख १४ हजार ७३५ लाभार्थी शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र त्यापैकी केवायसी केलेल्या एक लाख ६३ हजार ३२१ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला सहा हजार रुपयांची रक्कम जमा होणार आहे.