५ वी आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणं बंधनकारक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता पाचवी आणि आठवीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी दोन महिन्यात घेतलेल्या फेरपरीक्षेतही अनुत्तीर्ण झाले तर त्यांना पुन्हा त्याच वर्गात बसवण्याचा निर्णय शाळांनी घ्यायला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना काल राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं जारी केली. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेतून काढता येणार नाही, असंही या अधिसूचनेत म्हटलं आहे.