पेरण्या लांबल्याने शेतकरी चिंतेत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील शेतकरी सध्या मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. दमदार पावसाअभावी पेरण्या लांबल्याने धुळे जिल्ह्यात शेतकरी चिंतेत आहे. काही गावांमध्ये पाण्याची समस्या तीव्र झाली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अकोला जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीची कामं आटोपली असून शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने सर्वांचंचं लक्ष आता पावसाकडे लागून राहिलं आहे. वाशीम जिल्ह्यात वन्य प्राण्यांना चारा आणि पाण्यासाठी भटकावं लागत आहे. हे वन्यप्राणी पाण्यासाठी क्वचित मानवी वस्तीत येत असल्याने मानव प्राणी संघर्षाच्या छोट्या मोठ्या घटना घडत आहेत.