म्हाडाच्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे नुकत्याच जाहीर केलेल्या ४ हजार ८२ सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे. इच्छुक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आणि अनामत रकमेचा भरणा करण्यासाठी १० जुलै पर्यंत मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक अर्जदार १० जुलै संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतील, तर रात्री १२ वाजेपर्यंत अनामत रक्कमेचा ऑनलाइन भरणा करू शकतील. १२ जुलैला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे. अर्ज करताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींवर मार्गदर्शनासाठी ०२२-६९४६८१०० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आलं आहे.  

Popular posts
जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती
Image
‘बार्टी’च्या महासंचालकपदी धम्मज्योती गजभिये रुजू
Image
तिसऱ्या राष्ट्रीय पोषण महिन्यानिमित्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नागरिकांना कुपोषण-मुक्त भारतासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आणि योगदान देण्याचे आवाहन
Image
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी नाशिक शहर संघचालक नानासाहेब गर्गे यांचं निधन
Image
९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांची निवड
Image