रत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे मार्गावर झालेल्या अपघातात ८ जणांचा मृत्यू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली-हर्णे मार्गावर आसूद इथं ट्रक आणि रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. काही जखमींना मुंबईतल्या रुग्णालयात दाखल केलं आहे. 

या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे, तसंच मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चानं  करण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांनी याविषयी अधिक माहिती घेतली.