कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करण्याचं उद्धव ठाकरे यांचं आव्हान

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळातल्या व्यवहारांची चौकशी करायची असेल तर मुंबईप्रमाणे राज्यातल्या इतर महापालिकांमधल्या व्यवहारांचीही चौकशी करावी असं आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य सरकारला दिलं. मुंबईत स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. कोरोना काळात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू होता. त्यानुसार सर्व काही उपाययोजना केल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.

पाटण्यातल्या बैठकीत सहभागी झाल्याबद्दल आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या शेजारी बसल्याबद्दल विरोधकांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं. समान नागरी कायदा लागू करताना तपासणी करतानाही समान निकष लावा. केवळ विरोधकांच्या नव्हे तर सत्ताधाऱ्यांच्या विरोधातल्या आरोपांचीही केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.