भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात पुढचं पाऊल टाकत केंद्र सरकारनं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी दिली आहे. नोंदणी करण्यासाठी हे नागरिक त्यांच्या पासपोर्टचा वापर करू शकतात. देशात, विशेषत: महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात परदेशी नागरिक राहतात. त्यामुळे त्यांना संसर्गापासून सुरक्षा मिळावी आणि संसर्गाचा प्रसार टाळला जावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.