दिवाळीनिमित्त ‘ग्रेऑन’चा फेस्टिव्ह गिफ्ट-बॉक्स


चमकदार लुक देणा-या सहा कॉस्मेटिक उत्पादनांचा समावेश


मुंबई : भारतात विकसित झालेल्या ग्रेऑन या कॉस्मेटिक ब्रँडने फेस्टिव्ह गिफ्ट-बॉक्स आणला आहे. येत्या सणासुदीत मोहक आणि चमकदार लुकसाठी प्रत्येक महिलेला मेकअप व्हॅनिटीमध्ये हवी असलेली प्रत्येक वस्तू या बॉक्समध्ये आहे. ग्रेऑन गिफ्ट बॉक्समध्ये ग्रेऑन प्रीमियम मॅट लिक्विड लीप कलर, ग्रेयॉंन लिक्विड लिप ग्लॉस, ग्रेऑन मॉइश्चरायझिंग लिपस्टिक, ग्रेऑन सॉफ्ट एक्झिसाइट काजल, ग्रेऑन लिप बाम आणि ग्रेऑन मस्कारा यांचा समावेश आहे. 


ब्रँडच्या या अतुलनीय गिफ्ट बॉक्सद्वारे आपण प्रियजनांना एक परिपूर्ण गिफ्ट देऊ शकतो. सणासुदीतील ऑफर म्हणून ३०२४/- रुपये मूळ किंमतीचा हा बॉक्स फक्त ९९९/- रुपयांमध्ये उपलब्ध होईल. अॅमेझॉन, स्नॅपडील आणि फ्लिपकार्टसारख्या आघाडीच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये हा बॉक्स उपलब्ध असून ब्रँडच्या अधिकृत संकेतस्थळ ग्रेयॉंनडॉटइनवरही उपलब्ध आहे.


ग्रेऑनचे मुख्य रणनीती अधिकारी पंकज कोडेसिया म्हणाले, 'आम्हाला उत्सवाचा आनंद द्विगुणित करायचा आहे. स्वत:चे कौतुक करून घेण्याकरिता सर्व सुंदर महिलांसाठी हा एक संग्रह म्हणजे एक परिपूर्ण गिफ्ट बॉक्स आहे. यासह याची एक्सक्लुझिव्ह किंमत ही देखील उत्सव साजरा करण्याचे आणखी एक कारण ठरेल.'