आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताने तीन पदके मिळवली

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात सुरू असलेल्या वीस वर्षाखालील आशियाई ऍथलेटिक्स स्पर्धेत पहिल्याच दिवशी काल भारताने दोन सुवर्णपदकांसह तीन पदके मिळवली. रेझोअना मल्लिक हीना हिने महिलांच्या 400 मीटर शर्यतीत आणि भरतप्रीत सिंग याने थाळीफेक प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. ऱेझोअनाने 53 पूर्णांक 31 शतांश सेकंदात 400 मीटर अंतर पार केले.

या वर्षाच्या सुरुवातीला 18 वर्षाखालील आशियाई मैदानी खेळांच्या स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यानंतर, रेझोआना आता 18 वर्षाखालील आणि 20 वर्षाखालील या दोन्ही प्रकारांमध्ये चारशे मीटर प्रकारातली आशियाई अजिंक्यवीर ठरली आहे.