आषाढी एकादशी निमित्त येत्या २८ जून रोजी विविध साधु संताच्या पालख्यांचं पंढरपूर आणि परिसरात होणार आगमन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी एकादशी निमित्त येत्या २८ जून रोजी विविध साधु संताच्या पालख्यांचं पंढरपूर आणि परिसरात आगमन होणार आहे. २९ जून रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा होणार आहे. तर चार जुलै रोजी महाद्वार काला होऊन आषाढी वारीची सांगता होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वारकऱ्यांसाठी विविध सेवा सुविधाची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिला भाविकांसाठी जवळपास तीन हजार ठिकाणी स्नानगृहं उभारण्यात आली असून, साडे आठ हजार ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. २१ आपत्ती व्यवस्थापन केंद्रे तयार करण्यात आलेली आहेत. पाणी पुरवठ्यासाठी ४९ टँकर्स आणि त्यामध्ये पाणी भरण्याची सुविधा करण्यात आली आहे. औषधोपचार केंद्र, गॅस वितरण व्यवस्था, तसंच सुरक्षेबाबत नियोजन करण्यात आलं आहे.