राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांची निवड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पंचविसाव्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात आज त्यांनी ही घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे दोघे कार्यकारी अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळतील असं पवार यांनी सांगितलं. या दोघांकडे पंजाब, हरयाणा आणि महाराष्ट्र या तीन राज्यांचा प्रभार सोपवण्यात आला आहे.