खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) खादी ग्रामोद्योग आयोगानं १ लाख ३४ हजार कोटी रुपये उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी आज दिली. आयोगाच्या उलाढालीत  गेल्या ९ वर्षांत ३३२ टक्क्यांची वाढ झाली आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी कुमार यांनी कारागिरांनी नोकऱ्या मागण्याऐवजी उद्योजक बनून इतरांना रोजगार देण्याचं आवाहन केलं. मेक फॉर द वर्ल्डसोबतच मेक इन इंडियाचा मंत्र घेऊन पुढे जाण्याचा सल्लाही त्यांनी दिला.