भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहील असा अंदाज फिच पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे. फिच नं याआधी हा दर ६ टक्के राहील असा अंदाज दिला होता. जानेवारी ते मार्च २०२३ या काळात कारखानदारी आणि बांधकाम क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली झाल्यामुळे हा सुधारित अंदाज वर्तवल्याचं फिच ने म्हटलं आहे. २०२४-२५ आणि२०२५-२६ या आगामी दोन वर्षांमधे भारताचा आर्थिक वाढीचा दर साडेसहा टक्के राहील, असा फिच चा अंदाज आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image