दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एस आय ए आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला सुरूवात

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दहशतवाद आणि फुटीरतावादाला चालना देण्यासाठी वापरण्यात आलेल्या जम्मु काश्मीर मधल्या ८६ ठिकाणच्या १२४ मालमत्ता जप्त करण्यासाठी एसआयए आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या कायदेशीर मोहिमेला आज सुरूवात झाली आहे. राज्य तपास संस्था अर्थात SIA आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या कार्यकारी गटानं राज्यविरोधी कारवाई संबंधित सरकारच्या शून्य सहिष्णुतेच्या धोरणाशी सुसंगत, दहशतवाद निधीच्या विरोधात कायदेशीर चौकट विस्तृत केली आहे. 

बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा अर्थात UAPA च्या कलम 8 आणि कलम 25 अंतर्गत  SIA ,पोलिस कार्यकारी शाखा आणि  संबंधित न्यायालयांनी या कलंकित मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. दहशतवादाविरुद्ध दृढ निश्चय दाखवून, आंतरराष्ट्रीय सनद आणि दहशतवादाविरुद्धच्या अधिवेशनांच्या आवश्यकतेनुसार, दहशतवाद समर्थन प्रणालीचं निर्मूलन करण्यासाठी कायद्याच्या योग्य प्रक्रियेंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.