सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं सर्व परीक्षांची प्रमाणपत्रं डिजिटल पद्धतीनं देण्याचा निर्णय घेतला आहे. परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी ही माहिती दिली. सर्व प्रमाणपत्रांमध्ये डिजिटल स्वाक्षरी आणि क्यूआर कोड वापरण्यात येणार आहे. डिजिटल प्रमाणपत्रांमुळे परीक्षा परिषदेची आर्थिक बचतही होणार असल्याचं ते म्हणाले.

परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी, टायपिंग आदी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची बनावट प्रमाणपत्रं तयार करण्यात आल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत, असे प्रकार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, पुढील परीक्षेपासून विद्यार्थ्यांचा ई-मेल आयडी घेऊन त्यावरच प्रमाणपत्र पाठवण्यात येणार असल्याचं बेडसे यांनी सांगितलं.