भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) डीजीएफटी अर्थात परकीय व्यापार महासंचालनालयानं भारतातील नागरी वापरासाठी उपयुक्त ड्रोन निर्यात धोरण शिथिल केलं आहे. भारताच्या परकीय व्यापार धोरण २०२३ मध्ये उच्च तंत्रज्ञान उत्पादनांच्या निर्यात सुलभीकरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिली आहे. या धोरणात बदल केल्यामुळे भारताला जागतिक पटलावर ड्रोन उत्पादक म्हणून चालना मिळेल तसंच स्टार्ट-अप आणि नवीन ड्रोन उत्पादक व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळेल असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे.