राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांना त्यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. असामान्य बुद्धिमत्ता, सन्मान आणि जनकल्याणासाठी कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रपती मुर्मू या एक दीपस्तंभ आहेत. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची कायम प्रशंसा होत राहील. अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी  प्रधानमंत्री मोदी यांनी  आपल्या ट्विट संदेशात शुभकामना दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या आदिवासी समाजातल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म  २० जून १९५८ मध्ये ओडिशातल्या  मयूरभंज इथल्या उपरबेडा गावात एका संथाली आदिवासी कुटुंबात झाला आहे.