राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी घेणार बैठक

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेल्या ३ महिन्यांत बेपत्ता होणाऱ्या मुली आणि महिलांच्या वाढलेल्या संख्येविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर सोमवारी बैठक घेणार आहे. यासाठी राज्याच्या गृहसचिवांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. या बैठकीला पोलिस महासंचालकांचे प्रतिनिधीही उपस्थित असतील, असंही त्यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. या संदर्भात एक स्वतंत्र समितीच्या विशेष तपास पथक स्थापन करण्याची राज्य महिला आयोगाची सूचना आहे.