भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे - पी. चिदम्बरम

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातलं भाजपा सरकार गेल्या ९ वर्षात सर्व आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे, अशी टीका माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. ते मुंबईत टिळकभवन इथं आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. दोन हजाराची नोट चलनात आणणं आणि परत घेण्याच्या चुकीच्या निर्णयामुळे भारताच्या चलन अखंडतेवर आणि स्थिरतेबाबत शंका निर्माण झाली आहे, सध्याची परिस्थिती २००४ ते २००९ मधल्या तेजीच्या वर्षांच्या ९ टक्के वाढीच्या सरासरीपेक्षा खूप दूर आहे, असं ते म्हणाले. 

 केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातली दरी वाढत आहे, ही आणखी एक चिंतेची बाब आहे. गेल्या तीन वर्षात देशाच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांवर संसदेत चर्चा होऊ दिली नाही. मणिपूरमध्ये चिंताजनक परिस्थिती असूनही प्रधानमंत्र्यांचं सततचं मौन गंभीर आहे, असं ते म्हणाले.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image