कोकणात बारसू प्रकल्प उभारण्यास जलतज्ञ राजेंद्र सिंह यांचा विरोध

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोकणातल्या बारसू इथल्या प्रस्तावित तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या उभारणीला प्रख्यात जलतज्ञ राजेंद्र सिंह यांनी विरोध दर्शवला आहे. ते काल  नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. तेलशुद्धिकरणासारख्या प्रकल्पातून निसर्गाचा ऱ्हास होऊ शकतो. त्यामुळे असे प्रकल्प टाळले पाहिजे. त्याऐवजी पर्यटनाच्या माध्यमातून कोकणवासियांना रोजगार दिला पाहिजे, असं ते म्हणाले.