महिलांच्या तपासासाठी गृह विभागानं समिती स्थापन करावी - रुपाली चाकणकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातल्या महिला आणि मुली बेपत्ता व्हायची आकडेवारी चिंताजनक असून या महिलांच्या तपासासाठी गृह विभागानं समिती स्थापन करावी, तसंच दर पंधरा दिवसांनी रावबवलेल्या शोध मोहिमेचा आणि केलेल्या कारवाईचा अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गृह विभागाला केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून १६ ते ३५ वयोगटातल्या बेपत्ता होणाऱ्या महिलांची संख्या लक्षणीय आहे. यापार्श्वभूमीवर राज्य पोलिस आणि गृह विभाग याबाबत करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आज राज्य महिला आयोगानं सुनावणी घेतली. तसंच बेपत्ता महिलांच्या शोधासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या समितीमध्ये पोलिसांचा समावेश नाही, याकडे लक्ष वेधत यात पोलिसांचा समावेश करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image