राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाची नोटीस

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयानं नोटीस पाठवली आहे. काल संध्याकाळी आपल्याला ही नोटीस मिळाली अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. ही नोटीस देण्यामागचं कारण, नोटीशीत नाही, मात्र आयएलएफएस या कंपनीचा त्यात उल्लेख असून, या कंपनीसोबत आपला कधीही संबंध आला नसल्याचा दावा पाटील यांनी केला. या नोटीशीनुसार आपण चौकशीला सामोरं जाऊ, मात्र पुढचे काही दिवस कुटुंबात लग्नकार्य असल्यानं, काही दिवसांचा वेळ द्यावा असं पत्र आपण सक्तवसुली संचालनालयाला दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं.