राज्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या वसतीगृहांचं बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण केलं जाईल - डॉ. विजयकुमार गावित

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या सर्व आश्रमशाळांमधल्या वसतीगृहांचं बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण केलं जाईल असं आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी काल सांगितलं. नागपूर जिल्ह्यात हिंगणा तालुक्यातल्या कवडस इथल्या शासकीय आश्रमशाळेतल्या वसतीगृहाचं भूमिपूजन डॉ. गावित यांच्या हस्ते झालं; त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी आश्रमशाळांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याला राज्य सरकारचं प्राधान्य आहे; तसंच आदिवासी आश्रमशाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विशेष कार्यक्रम राबवणार असल्याचं गावित यांनी सांगितलं.