राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यांचा विकास झाला तरंच देशाचा विकास होऊ शकतो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राजस्थानमधल्या नाथद्वार इथं साडेपाच हजार कोटी रुपयांच्या अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमीपुजन झालं त्यावेळी ते बोलत होते. विकासाची प्रक्रिया वेगवान असावी आणि त्यातून शाश्वत विकास घडावा यासाठी पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखीत केलं. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८, २५ आणि ५८शी संबंधीत प्रकल्प देशाला समर्पित केले.