शरद पवार राजीनाम्याबाबत १-२ दिवसांत अंतिम भूमिका घेणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा, यासाठी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचं ठिय्या आंदोलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या प्रांगणात सुरू आहे. आज शरद पवार यांनी या आंदोलक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राबाहेरून तुमचे अनेक सहकारी इथं आले आहेत.

उद्या संध्याकाळपर्यंत माझी त्यांच्याबरोबर बैठक होईल. त्यानंतर तुमच्या सगळ्यांची भावना नजरेसमोर ठेऊन आणि बाहेरून आलेल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन, येत्या एक ते दोन दिवसांत अंतिम भूमिका घेऊ. पण ती भूमिका घेताना कार्यकर्त्यांच्या मनातली भावना दुर्लक्षित केली जाणार नाही, असं पवार म्हणाले. दोन दिवसानंतर तुम्हाला असं बसावं लागणार नाही, याची खात्री देतो, असंही ते म्हणाले.