कर्नाटकातल्या मराठीभाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभी - उपमुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कर्नाटकातल्या मराठी भाषकांच्या पाठीशी भाजपा खंबीरपणे उभा असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज प्रचारसभेत सांगितलं. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी बेळगाव इथं आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आंदोलकांनी सभेच्या ठिकाणी काळे झेंडे दाखवले.