येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागात उष्णतेची लाट येईल, असा  अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईत आज, तर धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात आज आणि उद्या उष्णतेची लाट राहील. राज्याच्या १७ प्रमुख जिल्ह्यांमध्ये तापमानानं  ४० अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला  असून,  सर्वात जास्त कमाल तापमान जळगाव इथं ४४ पूर्णांक ६ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.