महिला लोकशाहीदिनी अर्ज करण्याचे आवाहन

 

मुंबई : प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११.०० वाजता समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, १० वा माळा, बांद्रा येथे महिला लोकशाही दिन घेण्यात येणार आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी या दिवशी या ठिकाणी अर्ज करावेत असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी बी. एच. नागरगोजे यांनी केले आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे व त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना त्वरित न्याय मिळावा, यादृष्टीने त्यांच्या तक्रारींची सोडवणूक करण्यासाठी शासनाने दिनांक 04 मार्च 2013 रोजीच्या शासन निर्णयान्वये तालुका, जिल्हा, विभागीय व मंत्रालयीन स्तरावर महिला लोकशाही दिन राबविण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. मागील दोन वर्षांत कोविड प्रादूर्भावामुळे घालण्यात आलेल्या निर्बधांमुळे महिला लोकशाही दिन आयोजित करता आला नाही. परंतु शासनाच्या निर्देशानुसार पीडित महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा स्तरावर महिला लोकशाही दिनांची अमंलबजावणी सुरू करण्यात आली आहे.

महिला लोकशाही दिनासाठी विहीत नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. सदर अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, ला टप्पा 2 रा मजला, आर.सी.मार्ग,चेंबूर-71 दूरध्वनी क्रमांक – 022-25232308 येथे उपलब्ध आहेत.

महिला लोकशाहीदिनांचे स्तर

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा चौथ्या सोमवारी तहसिलदार, कार्यालय, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी – जिल्हाधिकारी कार्यालय, विभागीयस्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याचा दुसऱ्या सोमवारी – विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहेत.