एनव्हीएस 01 या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एनव्हीएस ०१ या दिशादर्शक उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं जीएसएलव्ही एफ १२ या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. या उपग्रहाबरोबर पहिल्यांदाच स्वदेशी बनावटीचं आण्विक घड्याळ वापरलं जाणार आहे. हा उपग्रह  भारतीय नक्षत्र दिशादर्शक मालिकेचा एक भाग असून, निरीक्षण आणि दिशादर्शक क्षमता प्रदान करणं हे याचं उद्दिष्ट आहे. २ हजार २३२ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह भारतीय नक्षत्र लिकेमधला दुसऱ्या पिढीतला पहिला दिशादर्शक उपग्रह आहे.

या उपग्रहाला येत्या दोन दिवसांत निर्धारित पातळीपर्यंत नेण्यासाठी कक्षा वाढवण्याच्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. या उपग्रहाद्वारे गोळा केलेल्या डेटाचा यक्तिक आणि धोरणात्मक कामासाठी वापर केला जाईल. या मोहिमेमुळे केवळ नक्षत्र मालिकाच नव्हे तर स्वदेशी बनावटीचं  रुबिडियम घड्याळ कार्यान्वित करणाऱ्या इतर तीन देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे. आजच्या यशस्वी मोहिमेमधून इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आणखी एक कठीण प्रयोग सिद्ध केला आहे.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
मुंबईतील किल्ल्यांच्या विकास शासकीय निधीबरोबरच बाह्यस्त्रोताद्वारे राबविण्याचे नियोजन करावे – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image