नागपूर विद्यापीठानं कौशल्‍य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्‍यबळ तयार करावं- राज्यपाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नागपूर विद्यापीठानं नुकत्‍याच स्‍थापन झालेल्‍या कौशल्‍य विद्यापीठाच्या सहकार्यानं कुशल मनुष्‍यबळ तयार करावं, असं आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी केलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ११० वा दीक्षांत समारंभ प्रसंगी आज ते बोलत होते. भारत युवा देश म्‍हणून उदयास येत असून, जपान, जर्मनी, इटली फ्रान्‍स सारखे अनेक देश म्‍हातारे होत आहेत. हे देश कुशल मनुष्‍यबळाच्‍या गरजा पूर्ण करण्‍यासाठी भारताकडे अपेक्षेने पाहत आहेत असंही राज्यपाल यावेळी म्हणाले.  राज्‍यपाल बैस यांनी शताब्‍दी वर्षानिमित्‍त विद्यापीठाला शुभेच्‍छाही  दिल्‍या. शुभांगी रामचंद्र परांजपे यांना या समारंभात डी.लीट. पदवी प्रदान करण्‍यात आली. आणि अन्य पुरस्कारांचं देखील वितरण करण्यात आलं.