कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची आमदार धनंजय मुंडे यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कांदा अनुदानासाठी ई-पीक पेरा नोंदणीची अट काढून टाकण्याची मागणी आमदार धनंजय मुंडे यांनी, एका ट्विटमधून केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंद केलेली नाही, दुर्गम ग्रामीण भागात आजही वीज आणि इंटरनेटच्या समस्या आहेत, अशा भागातल्या शेतकऱ्यांना पिकांची ऑनलाइन नोंदणी दुरापास्त आहे. त्यामुळे ई-पीक पेरा नोंदीची अट शिथिल करण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे. राज्य शासनाने एक फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान विक्री केलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल साडे तीनशे रुपये अनुदान जाहीर केलेलं आहे.