भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही - माजी मुख्यमंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भारतीय जनता पक्षाला देशात दुसरा कोणताही पक्ष राहू द्यायचा नाही, अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल जळगाव जिल्ह्यात पाचोरा इथं जाहीर सभेत बोलत होते. भाजपच्या पक्षविस्ताराच्या धोरणावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले… 

“भारतीय जनता पक्षाला देशामध्ये राजकारणात मित्र पण नकोयत आणि स्वतःच्या पक्षातले चांगले लोकं नकोयत. हा कुठला न्याय आहे? हा कुठला पक्ष आहे? कोणता पक्षवाढीचा हा विषय? आज माझ्याकडे नाव, चिन्ह नसतांनासुद्‌धा जनसागर उसळतोय, हा माझा पक्ष आहे. ही माझी शक्ती, ही माझी ताकत आहे. आणि शिवसेना प्रमुखांचे आशिर्वाद आहेत. पण स्वतःच्या पक्षात जी चांगली माणसं आहेत, ती आपल्याला डोईजड होणारेत, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांना पक्षातून काढून टाकायचं, पक्षातून ते जातील असं बघायचं. आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांना भ्रष्टाचाराचे आरोप करून स्वतःच्या पक्षात घ्यायचं हा कोणता न्याय आहे?”

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image